क्षणाधिश!
क्षणाधीश! क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् । क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ॥ अर्थात - - एक एक क्षण वाया न घालवता विद्या प्राप्त केली पाहिजे आणि एक एक कण वाचवून धन गोळा केले पाहिजे . जो क्षण वाया घालवतो त्यास विद्या प्राप्त होत नाही व जो कण वाया घालवतो त्यास धन प्राप्त होत नाही . आज बाबांची खूप आठवण येतेय ! मला माझे लहानपण आठवतंय . तसे कळायला लागल्यावर मी नेहमीच बाबांजवळ जास्त असायचे . माझ्या पाठोपाठ छोटा भाऊ असल्यामुळे आईला माझ्यासाठी जास्त वेळ देता येत नसे . मग सगळ्या तक्रारी असो , हट्ट असो , प्रश्न असोत सगळे बाबांकडे असायचे . माझे बालपण दोन व्यक्तींच्या संस्कारात गेले . त्यांच्या विचारांचा पगडा आजही मनावर ठसलेला आहे . एक माझे बाबा आणि दुसरा माझा नाना मामा ! नाशिकला आम्ही मामाच्याच वाड्यात राहत असु . त्यावेळी माझा बहुतांश दिवस मामाकडेच जायचा . माझे बाबा मला शाळेतून आल्...